हिन्दी/ Hindi

Font Problem

संघटनेच्या संकेत स्थळाचा शुभारंभ

          आज दिनांक १ मे २००६ आंतराष्ट्रिय कामगार दिन व महाराष्ट्र दिन रोजी आपल्या संघटनेच्या संकेत स्थळाचा शुभारंभ व नवीन माध्यमाने संपर्काचा श्रीगणेशा करण्यास मला अत्यंत आनंद होत आहे.

          आपणा सर्वांना कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

          आज माहिती तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात क्रांती केली आहे. संगणक, मोबाईल, सर्वत्र आहेत. इंटरनेटचा वापर रेल्वे तिकीट काढण्यापासुन ते बँकाचे व्यवहार करण्यापर्यत सर्रास केला जात आहे. आपले सहकारी ही यात मागे नाहीत. कामगार कल्याण केंद्रीभूत मानून आपण विविध स्तरावर व माध्यमांतून कार्यरत आहोत. त्यात संकेत स्थळाची आज भर पडली आहे. कर्मचारी विविध स्थानावर ऑफीस-प्लांट-रीग-प्लँटफ़ाँम येथे कार्यरत असतात व १४ दिवस काम करुन १४ दिवस सुट्‍टीवरही असतात. संकेत स्थळाने सर्वांशी थेट संर्पंक साधणे संघटनेला शक्य आहे. आपले हक्काचे प्रकाशन २४ तास १२ महीने सर्वांसाठी उपलब्‍ध आहे. आपण सर्वानी यात सक्रिय सहभाग घ्यावा व आपली संघटना व कंपनीच्या प्रगती साठी सर्वांनी प्रयत्‍न करावेत.

          आज आपल्या कंपनीत छुप्या पद्धतिने कंत्राटीकरणा द्वारे खाजगीकरण केले जात आहे. ओएनजीसीने आपल्या काही कंपनीच्या रीग व काही विभागांचे कंत्राटीकरण करण्याचे योजले आहे. नवीन नोकर भरती बंद करण्यात आलेली आहे. तृतीय व चतुर्थ श्रेणी कामगारांच्या जरुर नसताना मुंबई बाहेर बदल्या करण्यात येत आहेत. ओएनजीसी चा नफा वाढत असता ऑफ़शोअरच्या सवलती काढून घेतल्या जात आहेत. नवीन सेल्‍फ़ लीज, (काही विभागात)ऑपरेशन अलाऊन्स, अटेंडंस बोनस, स्वीमींग पूल सवलत बंद करण्यात आले आहेत. हेलीबेस टँक्सी बिल, सीजन तिकीट, सुटकेसचे पैसे यात कपात करुन अनेक समस्या निर्माण करुन ठेवण्यात आलेल्या आहेत.

          दुसरीकडे वर्षानुवर्षे कंपनीत काम करणार्‍या कंत्राटी कामगारांना कामावरुन काढून त्यांना उध्वस्थ केले जात आहे. डायरेक्‍ट कामगारांच्या लढाईला आज एक तप लोटले आहे.

          हे असे घडले याचे कारण अपरिपक्व व चुकीच्या लोकांनी सत्तेचा गैरवापर करुन व्यवथापनाशी हातमिळवणी केल्यामुळे. कामगार भरती मध्ये घोटाळा करणार्‍या, कामगाराचे पैसे लुबाडणार्‍या लोकांच्या हाती सत्ता गेली आहे याचे परिणाम कामगारांना वरीलप्रमाणे भोगावे लागत आहेत.

          कर्मचारी संघटना बंद करण्यात आलेल्या सर्व सवलती पुर्वापार मिळऊन देण्यासाठी कटीबद्ध आहे. संघटनेचा आजवरचा इतिहास बघता अन्यायविरुद्ध प्रखर लढा देऊन कामगारांना न्याय मिळऊन दिल्याशिवाय कर्मचारी संघटना स्वस्थ बसणार नाही.

          आज पाहीले तर ओएनजीसी हि या देशातील प्रथम क्रमांकाची कंपनी आहे. आपल्या कंपनीचा निव्वळ नफा १५००० कोटी पेक्षाही जास्त आहे. तरी टेन्युअर रीगमँन पदावर भरती केलेल्या कामगारांचा पगार व इतर सुविधा पुन्हा नेमणुक करताना कमी करण्यात आल्या आहेत. यासाठी सत्तेत असलेल्या युनीयनने काही कलेले नाही.

          आता या सर्व गोष्टींचा जाणीवपुर्वक व गाभीर्यांने विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यायकारक प्रवृत्तिं विरुद्ध आपण लढणार आहोत की नाही हा महत्वाचा प्रश्न सर्वांसमोर आहे, आणि मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्याने, विश्‍वासाने, एकजुटीच्या जोरावर या प्रवृत्तिंचा बिमोड केल्याशिवाय कर्मचारी संघटना राहाणार नाही. मी आपणास अशी जाहीर ग्वाही देतो.

          कर्मचारी संघटना झिंदाबाद

          कामगार एकता झिंदाबाद

          आपला नम्र

         ( प्रदीप मयेकर)
         जनरल सेक्रेटरी
         कर्मचारी संघटना
 

 

 

संघठन की वेबसाईट का शुभारंभ

          आज मई २००६ अन्तराष्ट्रिय श्रम दिवस और महाराष्ट्र दिवस के शुभ अवसर पर हमारे संघठन की वेबसाईट का शुभारंभ और इस नए माध्यम से संपर्क का श्रीगणेश करते हुवे मुझे अत्याधिक प्रसन्नता हो रही है।

          आप सभीको श्रम दिवस और महाराष्ट्र दिवस की हार्दिक बधाईंया ।

          सूचना तकनिक हमारे जीवनमे क्रांती ले आई है । कम्युटर, मोबाईल, सर्वत्र है। आज रेल टिकट खरीदने से लेकर बँक व्यवहार हेतू इंटरनेट का उपयोग आम बात है । हमारे सहकर्मी भी इसमे पीछे नही है । कार्मचारी कल्याण केंद्रीभूत मान संघठन विविध स्तर और माध्यम से कार्यरत है । आज वेब साईट भी इसमे जुडी गई है । कर्मचारी विविध स्थानोपर जैसे की ऑफीस-प्लांट-रीग-प्लेटफ़ार्म यहां कार्यरत रहते है, और १४ दिन काम कर १४ दिन छुट्टीपर भी होते है । संघठन को वेब साईट के माध्यम से सभी से सीधा संर्पंक सहज है । हमारा अपना प्रकाशन २४ घंटे बारह-मासी प्रत्येक के लीये हाजीर है । आप सभी इससे जुडे और अपने संघठन और कंपनी के उन्नती के लीये प्रयास करें ।

          आज हमारे कंपनी का अप्रत्यक्ष तरीके से ठेकेदारी द्वारा निजीकरण किया जा रहा है । ओ एन जी सी ने अपने कई रीग और विभागों मे ठेकेदारी देने की योजनायें बनाई है । नई स्टाफ भरती बंद कर दी गई है । तृतीय और चतुर्थ श्रेणी कर्मचारीयों का आवश्यकता बिना मुंबई के बाहर तबादला कीया जा रहा है । ओ एन जी सी का मुनाफ़ा बढते हुवे भी ऑफ़शोअर की सुविधांये कम की जा रही है । नया सेल्‍फ़ लीज, (कुछ विभागोमे)ऑपरेशन अलाऊन्स, अटेंडंस बोनस, स्वीमींग पूल सुवीधा, हेलीबेस टँक्सी अलाऊन्स आदीपर रोक लगाई गई है । सीजन टिकीट, सुटकेस का पैसौमे कटौती कर दी गई है । कई समस्याये है ।

          दुसरी तरफ सालों से कंपनीमे कार्यरत ठेकेधारी कर्मचारीयों को निष्कासीत कर तबाह किया जा रहा है । डायरेक्‍ट कार्मचारीयों का संघर्ष दशकपूर्वसे निरंतर जारी है ।

          अपरिपक्व व गलत लोगों ने सत्ताका दुरुपयोग कर कर्मचारीभेदी नीतिसे व्यवथापन से हात मिलाने की वजह समस्याये पैदा हूई है । कर्मचारी भरती मे घोटाला करनेवाले, कर्मचारीयोंका पैसा लुट्नेवालों के हाथमे सत्ता है । इसीका नतीजा कर्मचारी भुगत रहे है ।

          कर्मचारी संघठन रोक लगी सभी सुविधाये पुर्ववत दिलवाने हेतू दॄढप्रतिज्ञ है। अन्यायका प्रखर विरोध कर कर्मचारीयो कों न्याय दिलाना कर्मचारी संघठन का इतिहास है और हम अन्याय का अविश्रांत विरोध करते रहेंगे।

          आज ओ एन जी सी इस देश की चोटीकी कंपनी है । हमारे कंपनी का शुद्ध मुनाफ़ा १५००० करोड से ज्यादा है । किंतु टेन्योर रीगमँन कार्मचारीयो कों पुर्ननीयुक्ती के समय वेतन और सुविधांये कम कर दी गई है । इसके विरोधमे सत्ता प्राप्त युनीयन कुछ भी नही किया है ।

          अब इन सभी बातों पर अध्ययन कर गंभीरता से चितंन करने का समय है । अन्यायकारक प्रवृत्तिं के खिलाफ हमे लडाई लडनी है या नही इसका विचार सभी को कारना होगा । आप सभी की एकता और सहयोग से कर्मचारी संघठन इन प्रवृत्तियों का खातमा निश्चयही करेगा ऐसी उदघोषणा मै करता हुं ।

          कर्मचारी संघठन जिंन्दाबाद ।

          मजदुर एकता जिंन्दाबाद ।

          आपका नम्र

         ( प्रदीप मयेकर)
         जनरल सेक्रेटरी
         कर्मचारी संघठन