|
|
| WEBICE | ONGC REPORTS | ||
|---|---|---|---|


कर्मचारी बंधू आणि भगिनींनो,
ओएनजीसी,मुंबई ऑफशोर मधील
कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांसंदर्भात कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस -
श्री.प्रदीप मयेकर साहेब उद्या मंगळवार, दिनांक १७/०३/२०२६ रोजी,
सायंकाळी ठीक ६:०० वाजता आपल्या सर्व Offshore ला असणाऱ्या तसेच Off
मध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांशी VC मीटिंग द्वारे संपर्क साधणार आहेत.
सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, खाली दिलेल्या लिंक द्वारे सर्वांनी
VC मिटींगला उपस्थित रहावे.
धन्यवाद!
VC Link
Karmachari
Sanghatana VC
Tuesday, 17 March 2026, 6:00 pm
Google Meet
joining info
Video call link:
https://meet.google.com/npk-rgbh-iwn
नवनाथ टेमकर,
उपाध्यक्ष,
ओएनजीसी (डब्ल्यू.ओ.यु.) कर्मचारी संघटना.
Action
programme of our union in the “Nationwide Strike” declared on 12th
February 2026..
Strike
Notice Form L (See Rule 71).
GKS
Strike Notice Form L (See Rule 71).
Gratitude
Email by WIN Platform - Received Health Monitoring Equipment.
KS
Achievement - Fire Pump at BPB Process Complex made operational.
9th
JULY 2025 ONGC ACTION ON PGWFI STRIKE AGAINST THE ANTI LABOUR CODES.
Action
programme of our union in the “Nationwide Strike” declared on 09th
July 2025.
मराठी
अनुवाद संपाबाबत माहिती - पेट्रोलियम अँड गॅस वर्कर्स फेडरेशन ऑफ
इंडिया (PGWFI).
संपाबाबत संक्षिप्त माहिती - पेट्रोलियम अँड गॅस वर्कर्स फेडरेशन ऑफ
इंडिया (PGWFI).
STRIKE BANNERS DOWNLOAD AND PRINT FOR PROTEST.
Strike Notice Karmachari Sanghatana.
Strike Notice General Kamgar Sanghatana.
The Platform of Central Trade Unions defers Nation-wide General
Strike to 9th July, 2025.
Achivement-सी एन राव स्मृति पुस्तकालय कर्मचारी संघटना की मांग को
सफलता.
Conciliation minutes
26 Jun 2024 with both unions.
Conciliation minutes 5 Jun 2024 with Karmachari Sanghatana.
Conciliation meeting 4 Jun 2024 with Karmachari Sanghatana.
४ जून २०२४
संघटनेची अभ्यासपूर्ण निर्णायक वाटचाल
कर्मचारी
बंधु आणि भगिनींनो,
ऑफशोअर मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या १४
दिवसांवरून २१ दिवसांच्या On/Off ड्यूटी पॅटर्न करण्याच्या ओएनजीसी,
मुंबई व्यवस्थापनाच्या एकतर्फी निर्णयाविरोधात उपमुख्य श्रम आयुक्त
(केंद्रीय), मुंबई - श्री.संजय दाबी यांच्या दालनात आज दिनांक
०४.०६.२०२४ रोजी ओएनजीसी (डब्ल्यू.ओ.यु.) कर्मचारी संघटनेसोबत
Conciliation proceeding पार पडली.
या मीटिंगमध्ये
ओएनजीसी,मुंबई व्यवस्थापनातर्फे GM I/c - IR - श्री.विवेक झिणे
साहेब,DGM-HR - श्री पूर्ती साहेब,Sr.HR Executive - श्री.अजिथ जेवियर
साहेब, HR Executive - श्री.अनिल भवाते साहेब आणि कर्मचारी संघटनेचे
सरचिटणीस - श्री.प्रदीप मयेकर, उपाध्यक्ष - श्री.पराग कदम, उपसरचिटणीस
श्री.नवनाथ टेमकर,ऑफशोर सेक्रेटरी - श्री.सिद्धेश नारकर, उरणचे
कार्यकारणी सदस्य - श्री.दिलीप अरदाळकर उपस्थित होते.
कर्मचारी
संघटनेने ऑफशोर मधील कर्मचाऱ्यांसाठी २१ दिवसांचा ड्युटी पॅटर्न
करण्यासंदर्भातील व्यवस्थापनाच्या आडमुठेपणास कडाडून विरोध दर्शविला
असून,
ओएनजीसी (डब्ल्यू.ओ.यु.) कर्मचारी संघटनेने दिनांक २०.०५.२०२४
रोजी दिलेले पत्र क्र.ONGC/KS/047/2024 च्या अनुषंगाने व Mines Act
(खाण कायदा) -1947 नुसार, ऑफशोअरमध्ये १४ दिवसांची ड्युटी पूर्ण
केल्यानंतर ७ दिवसांची विश्रांती अनिवार्य आहे.
ऑफशोर मध्ये
काही Incharges कडून २१ दिवसांचा ड्युटी पॅटर्न सक्तीचा करण्याचे धोरण
अवलंबिले जात आहे व त्या संदर्भातले ई-मेल देखील ऑफशोर मधील
कर्मचाऱ्यांना पाठवले जात आहेत. या सर्व ई-मेलची प्रिंट आज उपमुख्य
श्रम आयुक्त (केंद्रीय), मुंबई - श्री.संजय दाबी यांना कर्मचारी
संघटनेकडून देण्यात आलेल्या आहेत.
१४ दिवसांचा duty pattern हा
Mines Act नुसार असुन, यासंदर्भात Govt Gazzete देखील उपलब्ध आहे. सदर
Gazzete नुसार १४ दिवसांच्या duty pattern मध्ये बदल न करता ऑफशोर मधील
कर्मचाऱ्यांसाठी २१ दिवसांचा ड्युटी पॅटर्न सक्तीचा न करण्याचे आदेश
सर्व इन्चार्जेसना द्यावे असे उपमुख्य श्रम आयुक्त (केंद्रीय), मुंबई -
श्री.संजय दाबी यांनी ओएनजीसी,मुंबई व्यवस्थापनास सांगितले आहे.
उपमुख्य श्रम आयुक्त (केंद्रीय), मुंबई - श्री.संजय दाबी यांनी
ओएनजीसी,मुंबई यांस कडून उद्या बुधवार,दिनांक ०५.०६.२०२४ रोजी दुपारी
१२:३० वा. कर्मचारी संघटनेस मीटिंग साठी बोलावण्यात आली आहे.
प्रदीप मयेकर
सरचिटणीस,
ओएनजीसी (WOU) कर्मचारी संघटना.
१ जून २०२४
कर्मचारी बंधू आणि भगिनींनो,
ऑफशोअर मध्ये
कार्यरत कर्मचाऱ्यांच्या १४ दिवसांवरून २१ दिवसांच्या On/Off ड्यूटी
पॅटर्न करण्याच्या ओएनजीसी, मुंबई व्यवस्थापनाच्या एकतर्फी
निर्णयाविरोधात ओएनजीसी (डब्ल्यू.ओ.यु.) कर्मचारी संघटनेने दिनांक
२०.०५.२०२४ रोजी दिलेले पत्र क्र.ONGC/KS/047/2024 च्या अनुषंगाने व
Mines Act (खाण कायदा) -1947 नुसार, ऑफशोअरमध्ये १४ दिवसांची ड्युटी
पूर्ण केल्यानंतर ७ दिवसांची विश्रांती अनिवार्य आहे.
१४
दिवसांचा duty pattern हा Mines Act नुसार असुन, यासंदर्भात Govt
Gazzete देखील उपलब्ध आहे. सदर Gazzete नुसार १४ दिवसांच्या duty
pattern मध्ये बदल करण्यासाठी त्या आस्थापनेतील युनियन सोबत करार करणे
आवश्यक आहे.त्यामुळे Govt. Gazzete च्या विरोधात आणि ऑफशोर मधील
कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विरोधात जाऊन ओएनजीसी मुंबई व्यवस्थापनाने
कामगार कायद्याची पायमल्ली केली आहे.
उपमुख्य श्रम आयुक्त
(केंद्रीय), मुंबई यांनी दिनांक ०४.०६.२०२४ रोजी कर्मचारी संघटनेने
दिलेल्या पत्राचे दखल घेऊन Conciliation proceeding साठी कर्मचारी
संघटनेस बोलविण्यात आले आहे.
आता तर ऑफशोर मध्ये काही Incharges
कडून २१ दिवसांच्या ड्युटी पॅटर्न राबविण्यासंबंधात सक्ती धोरण
अवलंबिले जात आहे. त्यामुळे १४ दिवसांची ज्यांची On Duty पूर्ण झाली
आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांनी, उपरोक्त नमुन्याप्रमाणे नमूद केलेल्या
अधिकाऱ्यांना ईमेल करावा किंवा दिलेल्या लेखी पत्राची प्रिंट काढून,
सदर पत्र भरावे व स्कॅन करून ई-मेल करावे तसेच ज्यांचा१४ दिवसांचा off
पिरियड संपत आहे, अशा सर्व कर्मचाऱ्यांनी duty वर जाण्यासंदर्भात आपली
उपलब्धता ईमेल द्वारे आपल्या कंट्रोलिंगला कळवावी.
सदर ई-मेलची
कॉपी मला pradeep _mayker@rediffmail.com या ईमेलवर cc ठेवावी.
Copy to :-
1) ED HRO - CPF No.73944 - goel_bc@ongc.co.in
2)
Location Manager, Services CPF No. 51530- saktavat_sks@ongc.co.in
3) GM-I/c,HR/ER, Services CPF No.61439 - aji_manju@ongc.co.in
4)
GM (HR), CPF No.82276 - dhiman_gr@ongc.co.in
5) GM (HR),I/c- IR -
CPF No.94190 - jhiney_vivek@ongc.co.in
6) OIM (CPF No.)
7)
pradeep_mayker@rediffmail.com
प्रदीप मयेकर
सरचिटणीस,
ओएनजीसी (WOU) कर्मचारी संघटना.
कर्मचारी बंधू आणि भगिनींनो,
आज दिनांक २८/०५/२०२४ रोजी,
कर्मचारी संघटनेची ओएनजीसी व्यवस्थापना सोबत HRO साहेबांच्या दालनात
मीटिंग पार पडली. व्यवस्थापनातर्फे ED- Chief-ER, श्री राजन अस्थाना
साहेब, GGM (HRO)- श्री.बी.सी.गोयल साहेब, GM- I/c, IR श्री विवेक झिणे
साहेब उपस्थित होते. सदर मीटिंग मध्ये कर्मचाऱ्यांच्या १४ दिवसांवरून
२१ दिवसांच्या On/Off ड्यूटी पॅटर्न राबविण्याबाबत चर्चा झाली, त्यावर
आपली ठाम भूमिका मांडत कर्मचारी संघटनेने २१ दिवसांच्या duty pattern
ला तीव्र विरोध केला.
कर्मचारी संघटनेने आपली प्रतिक्रिया देताना १४
दिवसांच्या duty pattern बदलण्यास स्पष्ट नकार दिला.
१४ दिवसांचा
duty pattern हा Mines Act नुसार असुन, यासंदर्भात Govt Gazzete देखील
उपलब्ध आहे. सदर Gazzete नुसार १४ दिवसांच्या duty pattern मध्ये बदल
करण्यासाठी त्या अस्थापनेतील युनियन सोबत करार करणे आवश्यक आहे.
त्यामुळे Govt. Gazzete च्या विरोधात जाऊन ONGC व्यवस्थापनाने घोडचूक
केलेली आहे.
कर्मचारी संघटना आपल्या मुद्द्यावर ठाम आहे.
ओएनजीसी
(डब्ल्यू.ओ.यु.) कर्मचारी संघटनेने दिनांक २०.०५.२०२४ रोजी दिलेले पत्र
क्र.ONGC/KS/047/2024 च्या अनुषंगाने, Mines Act (खाण कायदा) नुसार,
ऑफशोअरमध्ये १४ दिवसांची ड्युटी पूर्ण केल्यानंतर ७ दिवसांची विश्रांती
अनिवार्य आहे.*
त्यामुळे १४ दिवसांची ज्यांची On Duty पूर्ण
झाली आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांनी, उपरोक्त नमुन्याप्रमाणे नमूद
केलेल्या अधिकाऱ्यांना ईमेल करावा किंवा दिलेल्या लेखी पत्राची प्रिंट
काढून, सदर पत्र भरावे व स्कॅन करून ई-मेल करावे तसेच ज्यांचा१४
दिवसांचा off पिरियड संपत आहे, अशा सर्व कर्मचाऱ्यांनी duty वर
जाण्यासंदर्भात आपली उपलब्धता ईमेल द्वारे आपल्या कंट्रोलिंगला कळवावी.
सदर ई-मेलची कॉपी मला pradeep _mayker@rediffmail.com या ईमेलवर cc
ठेवावी.
Copy to :-
1) ED HRO - CPF No.73944 -
goel_bc@ongc.co.in
2) Location Manager, Services CPF No. 51530 -
saktavat_sks@ongc.co.in
3) GM-I/c,HR/ER, Services CPF No.61439 -
aji_manju@ongc.co.in
4) GM (HR), CPF No.82276 -
dhiman_gr@ongc.co.in
5) GM (HR),I/c- IR - CPF No.94190 -
jhiney_vivek@ongc.co.in
6) OIM (CPF No.)
7)
pradeep_mayker@rediffmail.com
Request to Deboard after completion of 14 days duty.
स्थानीय लोकधिकार समिती महासंघ सुवर्ण मोहोत्सवी अधिवेशन पुस्तिका ११
फेब्रुवारी २०२४.
Glimpses of 2023 Rangoli Competition by ONGC (WOU) Karmachari
Sangahatana.
आपल्या सोसायटीचे गिफ्ट वाटप थांबवण्याचा नतद्रष्टपणा करणाऱ्या
नेत्यांबद्दल खुलासा.
Karmachari Sanghatana Manifesto 2023.
कर्मचारी संघटनेची वचनपूर्ती व यशस्वीकार्य.
Loss of employees by PEU office bearers in OTA 2013.
HISTORIC MOU 2004 Revision by KARMACHARI SANGHATANA.
MOU 2004 LOSS OF EMPLOYEES BY PEU.
Interaction with EC regarding Organiatioanl Development Issues-req.
Dungarees Review by 29May2023.
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आवाहन.
Credit and Thrift society 2023 election official result.
Respected C&T Society members,
On behalf of the ONGC Employees Co
Operative Credit & Thrift Society Ltd. & Karmachari Sanghatana
Mumbai, we would like to extend our heartfelt gratitude to each and
every member of C&T society who casted their valuable vote for
carrying forward the Trust & Honesty of our panel lead by Shri.
Pradeep Mayekar Sir.
The various milestones achieved in the
past many years by C&T society working with honesty and integrity
have made the present members stand firmly behind our panel.
We Sincerely thanks to all the Officers and Staff
members from Offshore, Hazira Plant, Helibase, Green Heights, VB, 11
High, Panvel, Trombay, Nhava, Uran who participated and handled the
event throughout and made the event a memorable for us.
Finally, our special thanks to all members who have made special
efforts by explaining the work of our society to all the voters
without slacking anywhere in the campaign.
With Sincere
Gratitude and Regards,
Winner Team
KS Achivment covid 19 Uran Overtime.
Empanelment of Apollo Hospital, Nahsik, for PME.
Blood Donation Camp 2022 dates and hospitals list.
OO - Change in HBA Surety Rules 1Aug2022.
OO-Advisory for Travelling to Offshore by Helicopter 4Jul2022.
Our
Union Achivement Re-empalment of Medicine Store chain.
KS
achivement Pending dues of contracual employees of M/s Lifejet
Cardiac Ambulance Services paid.
Strike Notice - Contractual workers wage revision.
KS Achievement - ZEN Hospital Empanelment.
Offshore strike 28 & 29 detail programme.
Strike Slogan and Banner DOWNLOAD
& PRINT

Sports Selection Director offshore trophy 21-22.
Notice SLS Morcha for Secutech Automation employee.
02Feb22>Modified SOP for Crew change in Mumbai Offshore amidst
COVID-19 pandemic.
02Feb22> Record notes on Quarantine and Hotel Food.
५ जानेवारी २०२२
कर्मचारी बंधू आणि भगिनींनो,
COVID- 19 व
Omicron च्या सद्यस्थितीतील पार्श्वभूमीवर ऑफशोर मध्ये कार्यरत
कर्मचार्यांच्या स्वास्थ्य व सुरक्षिततेचे धोरणात्मक निर्णय
घेण्यासंदर्भात कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्री.प्रदीप मयेकर साहेब
यांच्याशी व्यवस्थापन गेले २-३ दिवस संपर्कात होती. परिस्थितीनुरूप
काही बदल करावयाचे झाले तरी १४ दिवसानंतर च्या Duty चा Overtime
देण्याचे श्री.प्रदीप मयेकर यांज कडून निष्ठुन सांगण्यात आले.सदर
गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन निर्णय घेण्यासाठी कर्मचारी संघटनेने
सोबत मीटिंग आयोजित करण्याचे श्री.प्रदीप मयेकर यांच्याकडून सूचित
करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज दिनांक ०५/०१/२०२२ रोजी, दुपारी
०३:०० वाजता व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटना यांमध्ये मिटिंग पार पडली.
व्यवस्थापनातर्फे श्री.माथवन साहेब (ED - MH Asset) , श्री रवि शंकर
साहेब (ED-B&S Asset), श्री.मजुमदार साहेब (ED - Neelam & Heera
Asset), श्री.सुनील सिंग साहेब (ED-HRO),श्री.पी.केशव राव साहेब
(GGM-LM- Drilling),सौ.माधुरी कलिता मॅडम (GM- I/c Medical Services) व
श्री.विवेक झीणे (GM - I/c - IR) आणि कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष
श्री.पराग कदम व श्री.पंकज कोळी व उप-सरचिटणीस श्री.नवनाथ टेमकर
उपस्थित होते.
सद्यपरिस्थितीला अनुसरून मागील प्रमाणेच
२८ दिवसांचा ऑफशोर ड्युटी पॅटर्न करण्यात आला आहे व हा पॅटर्न २
महिन्यापर्यंत असेल. तसेच विलगीकरण कालावधी (Quarantine Period) हा ७
दिवसांचा (५ दिवस Quarantine + ६ व्या दिवशी चाचणी + ७ व्या दिवशी Crew
Change ) असेल.त्यानंतर परिस्थितीनुरूप पुढील योग्य निर्णय घेण्यात
येईल.
सध्या हॉटेलमध्ये विलगीकरणात (Quarantine) असणाऱ्या Crew
चा केवळ Crew Change होईल. पुढच्या Crew Change ला योग्यवेळी
बोलावण्यात येईल.
सदर स्थितीला अनुसरून करण्यात आलेले बदल
पाहता, ' पूर्वीप्रमाणेच १४ दिवसानंतर केलेली Duty ही कायद्याप्रमाणे
Over Time गृहीत धरून १२ तासांचा Over Time देण्यासंदर्भात ठाम भूमिका
कर्मचारी संघटनेतर्फे मांडली व याबाबत पूर्वीप्रमाणेच कोणतीही तडजोड
केली जाणार नाही ' असे प्रतिपादन करण्यात आले.
COVID -19 च्या
गांभीर्यतेचे स्वरूप लक्षात घेऊन पूर्वीप्रमाणेच Crew Change साठी
व्यवस्थापनाने बसची सोय उपलब्ध करून देण्यासंदर्भात विचार मांडला.
कर्मचारी संघटनेने दिनांक २२.११.२०२१ रोजी दिलेले पत्र क्रमांक
ONGC/KS/214/2021 नुसार हॉटेल VITS ची अपुऱ्या आहार देण्यात आल्या
बद्दल तक्रार करण्यात आली होती त्यावेळी ONGC चे 10 अधिकारी आणि
कर्मचारी करोना बाधित असल्यामुळे हॉटेलमध्ये दाखल करण्यात आले होते. या
पुढे हॉटेलमध्ये विलगिकरणात (Hotel Quarantine) ठेवायचे झाल्यास योग्य
पोषक आहाराची सोय करण्यात यावी यासाठी कर्मचारी संघटना आग्रही राहिल,
अन्यथा करोना बाधित कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्येच दाखल करण्यात यावे
अशा सूचना कर्मचारी संघटनेतर्फे देण्यात आल्या.
कोविड ची लक्षणे
सौम्य असल्यास स्वतःच्या घरी विलगिकरणात ठेवण्याच्या सूचना देण्यात
आल्या.घरी सोय नसल्यास हॉटेल अथवा हॉस्पिटलमध्ये ठेवण्याच्या सूचना
देण्यात आल्या.
आत्ताच प्राप्त तक्रारीनुसार हॉटेल विलगीकरणात
असणाऱ्या एका हॉटेल कडून Bisleri च्या एका पेयजल बाटलीसाठी रु.५०/-
आकारण्यात येत होते.ही बाब व्यवस्थापनाच्या लक्षात आणून देताच, सदर
बाबतीत योग्य कार्यवाही होऊन तक्रार दूर करण्यात आली.
प्रकाश
दळवी,
अध्यक्ष,
ओएनजीसी (WOU)कर्मचारी संघटना.
Corp IR email on 22 Nov> Representation from recognised union Reg.
Safety Shoe committee.
२२ नोव्हेंबर २०२१
कर्मचारी बंधू आणि भगिनींनो,
सर्वांना सूचित करण्यात येते की, ओएनजीसी व्यवस्थापनाने आपल्या मागणीची
दखल घेऊन हेड क्वार्टर दिल्ली येथून मुंबई रिजन तर्फे मान्यताप्राप्त
युनियनच्या प्रतिनिधीचे नाव सेफ्टी कमिटीमध्ये समाविष्ट करण्यासाठी
मागविण्यात आले. कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस मा. श्री. प्रदीप मयेकर
यांचे नाव युनियनतर्फे सुचविण्यात आले व त्यानुसार मा. हेड एचआरओ व
इंचार्ज आय आर यांनी मा.श्री. प्रदीप मयेकर यांचे नाव सदर सेफ्टी शूज
कमिटीमध्ये समाविष्ट करण्यासाठी हेड क्वार्टर ला पाठवले.
यामुळे
युनियनतर्फे घोषित करण्यात आलेला उद्या करावयाचा हंगर स्ट्राईक रद्द
करण्यात आला आहे.
आपण सर्वांनी विषयाचे गांभीर्य ओळखून युनियनला
दिलेल्या सहकार्याबद्दल आपले सर्वांचे आभार व अभिनंदन.
प्रकाश दळवी,
अध्यक्ष
ओएनजीसी (WOU)
कर्मचारी संघटना
कर्मचारी संघटना जिंदाबाद!
Our achivement new food boxes for offshore 24 Oct 2021.
AIOTUCC24 Point letter to DHR. Regarding convening of urgent meeting on Long Pening Issues.
Demonstration photos PDDU Urja Bhawan 20 Sep 2021.
२० सप्टेंबर २०२१
कर्मचारी बंधू आणि भगिनींनो,
कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या व प्रलंबित मागण्यांसाठी अनेक महिने
मीटिंगसाठी वारंवार मागणी करूनही व्यवस्थापनाने दखल न घेतल्याने माननीय
श्री.प्रदिप मयेकर साहेब यांच्या नेतृत्वासह इतर मान्यताप्राप्त
युनियनचे सरचिटणीस यांनी एकमताने ठरवून स्वखर्चाने दिल्लीला आज दिनांक
२०.०९.२०२१ रोजी एकत्रित येऊन ओएनजीसीच्या,पंडित दीनदयाल उपाध्याय
भवन,दिल्ली येथे निदर्शन व धरणे दिले.
सदर बाबींची ओएनजीसी
व्यवस्थापनाने दखल घेतली असून उपस्थित मान्यताप्राप्त युनियनच्या जनरल
सेक्रेटरींना चर्चेसाठी बोलावले आहे. मान्यताप्राप्त युनियनच्या जनरल
सेक्रेटरींची आपसात व व्यवस्थानाबरोबर होणाऱ्या मिटिंगची माहिती आपणास
कळविण्यात येईल.
प्रकाश दळवी,
अध्यक्ष
ओएनजीसी (WOU)
कर्मचारी संघटना
कर्मचारी संघटना जिंदाबाद!
ऑफशोरला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विलगीकरण कालावधी (Quarantine Period)
कमी करण्याबाबत
कर्मचारी संघटनेच्या दि. २६/७/२०२१ रोजी दिलेल्या
पत्र क्र. १५ नुसार व दि. १० ऑगस्ट २०२१ वसुधारा भवन येथे सर्व
ॲसेटच्या ED समक्ष झालेल्या मीटिंग नंतरही
कर्मचारी संघटनेचे
सरचिटणीस श्री प्रदीप मयेकर साहेब सदर विषयाचा पाठपुरावा करण्याबाबत
Headquarters, देहरादून यांच्याशी सतत संपर्कात होते. त्याबाबतचा
अपेक्षित निर्णय प्राप्त झाला असून आज दिनांक १७.०९.२०२१ रोजी ओएनजीसी,
मुंबई व्यवस्थापनाने याबाबतची SOP जारी केली आहे.
१ ला दिवस :-
नियुक्त केलेल्या हॉटेलमध्ये Checkin
२ रा दिवस:- पहिल्या दिवशी
हॉटेलमध्ये Checkin केलेल्या Crew ची RT-PCR Test करणे.
३ रा
दिवस:- RT-PCR Test 'Negative' आल्यास कर्मचाऱ्याचा manifest बनवून
Offshore Duty ला पाठवणे.
उपरोक्त बाब Hotel मध्ये Checkin
करण्याच्या कमीत कमी१५ दिवस अगोदर COVID-१९ ची दोन्ही लस घेतलेल्या
ओएनजीसी कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे.
कर्मचारी संघटना जिंदाबाद!
प्रकाश दळवी,
अध्यक्ष
ONGC CTD circular
>Exemption in respect of expenditure Incurred on COVID-19 treatment
of employees .
B&S
Union flowup achived procuremnt of Trend Mill Bed Mattress Pillow
cover linen items.
SHREE GANESHOTSAV 2021 Western Offshore Unit.
NOTICE> C&T Society AGM 7th September 2021 5:30 PM NBP Green Heights
ENGLSH & MARATHI.
If lancer shoes problem, forward complaint to Union Office.
Society Titan watch requirment form.
ओ.एन.जी.सी. एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट ॲंड थ्रिफ्ट सोसायटी लिमिटेड.
आदरणीय सदस्यों,
उक्त सोसायटी की ३९वीं दिनांक ०७ सितम्बर
.२०२१ को आयोजित वार्षिक आमसभा का फलित संक्षेपमे।
आम सभा मे
विचार विनिमय पश्च्यात संस्था के सदस्यों के हित में निम्नलिखित निर्णय
लिए गए ।
१) अधिकतम कर्ज सीमा ₹१० लाख से ₹१२ लाख। (नियमों के
अधीन)
२) पुराने और नए कर्ज पर १ सितंबर से ब्याज दर ८% प्रति
वर्ष की दर से। (पुराना ब्याज दर ११% ) .
३) वित्तीय वर्ष
२०२०-२०२१ के लिये लाभांश (डिवीडंट) १५% थ्रिफ्ट फंड पर ब्याज ८%
।
भुगतान दिनांक ०९ सितम्बर २०२१ से आपके बैंक खाते में एनईएफटीसे क्रमश
जमा किया जाएगा।
४) अप्रेल २२ से पहले सदस्योंको उपहार (गिफ्ट)
का वितरण
।
५ ) पिछले शेष उपहारोंकी खरीद लागत से १५% छूट पर बेचने
करने की स्वीकृती। जो इन घड़ियों को खरीदना चाहते हैं, वे सभी २०
अक्तुबर २०२१ तक आवेदन पत्र सोसायटी कार्यालय मे जमा करे।
विशेष नोट:आयकरके नियम अनुसार अगर सदस्यका डिवीडंट ५००० से ज्यादा हो
तो १०% टीडीएस काटा जाएगा। थ्रिफ्ट फंड पर ब्याज ४०००० से ज्यादा
होनेपर १०% टीडीएस काटा जाएगा।
प्र
काश दळवी, अध्यक्ष | दत्तात्रेय माने, सचिव | प्रदीप म्हाडगुत, कोषाध्यक्ष|१० ऑगस्ट २१
कर्मचारी संघटनेच्या दि. २६/७/२०२१ रोजी दिलेल्या पत्र क्र. १५ नुसार
आज दि. १० ऑगस्ट २०२१ रोजी वसुधारा भवन येथे ऑफशोरला जाणाऱ्या
कामगारांच्या क्वारेंटाईन पिरियड कमी करण्याबाबत मिटींग आयोजित करण्यात
आली होती. सदर सभा ईडी सिडीएस श्री. जयस्वाल साहेब यांच्या
अध्यक्षतेखाली सर्वश्री माथवन साहेब - ईडी एमएच असेट,श्री. रविशंकर
साहेब - ईडी बी अँड एस असेट, श्री. मुजुमदार साहेब - ईडी एन एच
असेट,श्री. प्रसाद साहेब - ईडी ड्रीलिंग,श्री. सुनील सिंग साहेब -
जीजीएम एचआरओ,श्री. राव नावेद साहेब - सीजीएम एचआर, श्री.भाटिया साहेब
- इंचार्ज एचआर एमएच, श्री. संजय लाल साहेब - इंचार्ज एच एन डब्लू,
श्रीमती माधुरी कलीता - इंचार्ज मेडिकल, श्री. विवेक झेने - इंचार्ज
I/R तसेच कर्मचारी संघटनेच्या वतीने श्री. प्रदीप मयेकर सरचिटणीस,
सर्वश्री पराग कदम, पंकज कोळी व प्रदीप म्हाडगुत उपाध्यक्ष, नवनाथ
टेमकर व विजय भगत सहसरचिटणीस आदी पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत
उपरोक्त विषयावर खालील प्रमाणे चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.
१.
ज्यांचे लसीकरणाचे दोन्ही डोस झाले आहेत त्यांच्याबाबत पहिल्या दिवशी
हॉटेलमध्ये आल्यानंतर दुसऱ्या दिवशी टेस्ट, तिसऱ्या दिवशी टेस्टचा
निर्णय आल्यावर उपलब्ध क्रुचेंज नुसार त्यांना ऑफशोर मध्ये पाठवण्यात
येईल. या निर्णयाची अंमलबजावणी १ सप्टेंबर २०२१ पासून करण्याचे निश्चित
करण्यात आले.
२. ज्यांचे दोन लसीकरणाचे डोस झालेले नाहीत त्यांना
आताच्या नियमाप्रमाणे क्वारेंटाईन व्हावे लागेल. दोन डोस पूर्ण
झाल्यावर त्यांना वरील नियम लागू होतील.
३. कोकण व पश्चिम
महाराष्ट्र येथे नुकत्याच आलेल्या पुरस्थितीमुळे ऑफशोरला जाऊ न
शकलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या इंचार्ज एचआर यांना थ्रू प्रॉपर चॅनल
रीतसर अर्ज केल्यास सदर कामगारांना स्पेशल कॅज्युअल लिव्ह मंजूर
करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
प्रकाश दळवी,
अध्यक्ष,
ओएनजीसी (WOU) कर्मचारी संघटना.
पच्छिमी अपटत इकाई ओएनजीसी(डब्ल्यू.ओ.यु.) कर्मचारी संघटना मुंबई,
द्वारा सभी ऑफशोअर जाने वाले कर्मियों से जल्द से जल्द कोविड -१९ का
टिका लगवाने का अनुरोध करते हैं l
भवदिय
प्रदिप मयेकर
महासचिव
ओएनजीसी (WOU) कर्मचारी संघटना.
ONGC (WOU)
Karmachari Sanghatana, Mumbai once again request to all the offshore
going employees to get vaccinated at the earliest.
Regards,
Pradeep Mayekar,
General Secratary,
ONGC (WOU) Karmachari Sanghtana.
९ ऑगस्ट २१
मुंऑफशोरला जाताना सर्व स्टाफला हॉटेल लेमन ट्री येथे ७ दिवस
Quarantine व्हावे लागते. मागील महिनाभरात या हॉटेलसंबंधी अनेक तक्रारी
येत होत्या.याबाबतीत कर्मचारी संघटना व्यवस्थापनेशी वेळोवेळी बोलून
त्यांच्यापुढे आपल्या तक्रारी व बाजू मांडत होती. सोमवार दि. ९ ऑगस्ट
२०२१ रोजी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्री. प्रदीप मयेकर साहेब यांनी
व उपाध्यक्ष श्री. पराग कदम, श्री. प्रदीप म्हाडगुत, सहसरचिटणीस श्री.
नवनाथ टेमकर,सचिव श्री. जयवंत रसाळ तसेच मा. श्री. सुनील चिटणीस, श्री.
अनिल बागवे व ओएनजीसी व्यवस्थापनातर्फे एच एन डब्ल्यू इंचार्ज श्री.
संजय लाल साहेब यांच्या सोबत हॉटेल लेमन ट्री येथे अचानक भेट देऊन
हॉटेल चे व्यवस्थापक श्री.अभिराम मेनन यांच्याशी मिटींग केली.
त्यांच्याशी खालील मुद्द्यांवर चर्चा करून हॉटेलला निर्देश देण्यात
आले.
१. ब्रेकफास्ट, लंच, डिनर यांच्यात दर्जात्मक सुधारणा करून
फूड पॅक केल्यावर कमीत कमी वेळेत रुमपर्यंत पोहोचेल याबाबत काळजी
घेणे.तसेच फुडमध्ये काही चांगले बदल करावेत. याबाबतच्या सूचना हॉटेल
व्यवस्थापनाने मान्य केल्या.
२. रुममधून फोन आल्यावर तो अटेंड केला
जात नाही असे आढळून येत आहे, त्यात सुधारणा करण्याचे हॉटेल
व्यवस्थापनाने मान्य केले.
३. रूममध्ये पूर्वीप्रमाणेच अधिक टॉवेल,
साबण, लिक्विड सोप आदी ७ दिवस पुरेल इतके ठेवले आहे याची खात्री करून
नंतरच रूम ओएनजीसी कर्मचाऱ्यास वापरण्यास द्यावी.
४. सात
दिवसांमध्ये एकदा पीपीई किट घालून हॉटेल कामगाराने रूम स्वच्छ
करावी.बेडशीट बदलावी.यासाठी ओएनजीसी च्या मेडिकल सेक्शनकडून
पूर्वपरवानगी मिळवावी. न मिळाल्यास दरम्यान अधिक बेडशीट व कव्हर
रूममध्ये ठेवण्यात याव्यात.
सदर सूचना हॉटेल व्यवस्थापनाने
मान्य केल्या, सुधारणा करण्याचे कबूल केले. तसेच युनियनच्या वतीनेही
त्यांना पंधरा दिवसांनी पुन्हा व्हिजिट करणार असल्याचे त्यांना
सांगितले आहे.
प्रकाश दळवी,
अध्यक्ष,
ओएनजीसी (WOU)
कर्मचारी संघटना.
मुंबई ऑफशोर मधील कामगारांना फूडबॉक्स संदर्भात भेडसावणाऱ्या समस्यांबाबत ओएनजीसी कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी माननीय श्री.प्रदीप मयेकर साहेबांनी दि.०२/०८/२०२१ रोजी न्हावा सप्लाय बेस येथे भेट देऊन न्हावा हेड श्री.सतेंद्र राय साहेब तसेच फूडबॉक्स शी संबंधित समस्यांवर सखोल चर्चा केली.या वेळी फुडबॉक्स कंत्राटदारांचे सुपरवाइजर / मॅनेजर यांना देखिल बोलविण्यात आले होते व त्यांच्याही अडचणी जाणून घेण्यात आल्या.तसेच मयेकर साहेब यांनी कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष श्री.पराग कदम, श्री.प्रदीप म्हाडगुत व डेप्युटी जनरल सेक्रेटरी श्री.नवनाथ टेमकर तसेच ओएनजीसी स्थानीय लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष व उपाध्यक्ष न्हावा सप्लाय बेस श्री.संदीप गावडे तसेच न्हावा कर्मचारी संघटनेचे सेक्रेटरी श्री.निलेश कोर्लेकर व श्री.पंकज बागुल, श्री.अविनाश मुंबईकर व स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत दिवसभर न्हावा येथे अनेक ठिकाणी पाहणी करून तेथील सध्याच्या फुड बॉक्स भरण्यापासुन ते बोटीत लोड होण्यापर्यंतच्या प्रक्रियेची प्रत्यक्षात सप्लाय बोट मध्ये जाऊन माहिती घेतली. फुड बॉक्स व्यवस्थित हाताळण्याच्या व प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोहोचण्याच्या दृष्टीने महत्वाच्या सुचना केल्या.यावेळी अनेक कायमस्वरुपी आणि कंत्राटी कामगारांनी मयेकर साहेबांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या.
सर्व कामगार बंधू भगिनींना कळविण्यात येते की, कर्मचारी संघटनेने
केलेल्या प्रयत्नाअंती आपला वेतन करार अस्तित्वात आला. सर्वांना वेतन
करारातील फरकाचा लाभ मिळाला. आता या फरकामुळे लाभलेली रक्कम bifurcate
करण्यासाठी युनियन प्रयत्नशील होती. या प्रयत्नांना वरिष्ठ
व्यवस्थापनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळून आपल्याला वेतन फरकाची रक्कम
bifurcate करून देण्यासाठी सर्व पीसीएस हेड यांना ई-मेल आलेला आहे.
प्रत्येकाने आपापल्या पीसीएस हेड शी संपर्क साधून बायफरकेशन सर्टिफिकेट
ची सही शिक्क्यासह प्रत घ्यावी.
प्रकाश दळवी (अध्यक्ष)
Request to arrange the meeting for long pending issue of PPE items
and the issues enlisted.
७ जुन २०२१
बंधू आणि भगिनींनो,आज दिनांक ०७/०६/२०२१ रोजी दुपारी
०३:०० वाजता कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस आदरणीय श्री.प्रदीप मयेकर
साहेब,उपाध्यक्ष श्री.पराग कदम साहेब आणि ऑफशोर सेक्रेटरी श्री.नवनाथ
टेमकर साहेब यांनी 11 high लॉगिंग सर्विसेस येथे नवनियुक्त हेड लॉगिंग
सर्विसेस श्री.योगेश बहुखंडी (CGM Geophysics) यांची भेट घेऊन त्यांना
ओव्हरटाईम संदर्भातील बाब लक्षात आणून दिली. मागील वेळेस काही
कारणास्तव मिटिंगला हेड लॉगिंग उपलब्ध नव्हते,त्यामुळे काही तांत्रिक
अडचणी निर्माण होत होत्या. ओव्हरटाईम संदर्भातील प्रलंबित मुद्दा
कर्मचारी संघटनेच्या प्रयत्नातून यशस्वीरित्या निकाली लागला असून, तसे
निर्देश पनवेल येथील संबंधित इंचार्जेसना दिले आहेत.
आम्ही सर्व
लॉगिंग सर्विसेस तर्फे कर्मचारी संघटनेचे आणि पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक
आभार व्यक्त करतो.
धन्यवाद!
कर्मचारी संघटना जिंदाबाद!
पंकज लवेकर
( सहसचिव - पनवेल युनिट )
गणेश पाटील
अशोक गौडा
Helpline numbers Jumbo vaccination camp at ONGC NBP Green Heights.
६ मे २०२१
बंधू आणि भगिनींनो,
कर्मचारी संघटनेने दिलेल्या १०
मुद्द्यांच्या नोटीसीसंदर्भात दि. ४ मे २०२१ रोजी सहायक श्रम आयुक्त
यांच्याकडे कन्सिलेशन होणार होते. परंतु महाराष्ट्र शासनाने घोषित
केलेल्या लॉकडाऊन मूळे तसेच आपले इंचार्ज आय आर यांची अचानक आसाम येथे
बदली होऊन तेथे ते रुजू झाल्याने ओएनजीसी तर्फे पुढील तारीख देण्याची
विनंती ओएनजीसी मुंबई विभागातर्फे करण्यात आली. त्यावर सहाय्यक श्रम
आयुक्त यांनी सुनावणीची पुढील तारीख लॉकडाऊन संपल्यानंतर ईमेल द्वारे
ओएनजीसी व युनियन यांना कळविण्यात येईल असे आपल्याला फोनद्वारे कळविले
आहे.
सर्वांनी याची नोंद घ्यावी.
प्रदीप म्हाडगुत
सचिव.
२० एप्रिल २०२१
बंधू आणि भगिनींनो,
आज दिनांक २०/०४/२०२१
रोजी कर्मचारी संघटनेचे सचिव श्री. सुनील चिटणीस, सहसचिव श्री.
राजेंद्र मोरे आणि इतर पदाधिकारी यांनी ED-HDS श्री.आहुजा साहेब यांची
भेट घेतली आणि त्यांना Logging, Well services, Cementing, Chemistry
इत्यादींशी संबंधित सर्व सेक्शनल हेड ना OT संदर्भात सूचना देण्यास
सांगितले आहे.
वरील सर्व सेक्शनल हेड ना OT संदर्भात आजच सूचना
देण्यात येतील असे श्री.आहुजा साहेबांनी आश्वासित केले.
त्यानंतर
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्री.पी.व्ही.रमेश Head-DFS, Chemestry आणि
श्री अंशुमन दास LMCS, Head-Cementing यांचीही भेट घेऊन OT संदर्भात
झालेला निर्णय त्यांना सांगण्यात आला. तसेच Incharge-Logging आणि
Incharge- Work over ऑफिसमध्ये अनुपस्थित असल्याने त्यांची भेट होऊ
शकली नाही.
वरील सेक्शन मधील सर्व कर्मचाऱ्यांनी याची नोंद
घ्यावी आणि आपापल्या इन्चार्ज कडून त्यांना OT संदर्भात सूचना आल्यात
की नाही ते निश्चित करून घ्यावे.
या संदर्भात काही शंका असल्यास
कर्मचारी संघटनेच्या कार्यालयात किंवा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
प्रदीप म्हाडगुत,
नवनाथ टेमकर
सचिव.
०९ एप्रिल २०२१
२३:३५
कामगार बंधू आणि भगिनींनो,
कर्मचारी संघटनेने व्यवस्थापनास Strike Notice संदर्भात दिनांक
०१ मार्च २०२१ रोजी दिलेले पत्र क्रमांक ONGC/KS/91/2021 मधील प्रमुख
मागण्यांपैकी Issue No.1 च्या अनुषंगाने OT (Over Time) चा प्रलंबित
मुद्दा निकालात काढला असून, मुंबई व्यवस्थापनाच्या Asset चे सर्व ED,
GGM-HRO, HDS , CGM - I/c IR, CGM - ER Services, CGM - I/c HR ER - MH
Asset यांची आज दिनांक ०९.०४.२०२१ रोजी Video conferencing पार पडली.
मान्य झालेल्या मागणीनुसार १२/०४/२०२१ नंतर चालू Duty Pattern
प्रमाणे १४ दिवसानंतर पुर्ण केलेल्या दिवसांचा क्लेम करावा, तो संपुर्ण
OT (Over Time) मंजूर होईल व मार्च २०२० पासून कर्मचारी १४ दिवसानंतरचा
OT Claim करतील, तसेच या कालावधीतील १४ दिवसानंतरच्या OT सोबत अनमॅन चा
OT, १२ तासानंतरचा OT व National Holiday चा OT क्लेम करावा, परंतु २१
दिवसांनंतरचा OT व Duty Period मधील इतर ओटी व्यवस्थापन मंजूर करेल.
१/३ पेक्षा जास्त OT चे तास असल्याने Asset Manager,L1
Authority कडे OT चे forms Approve करण्यासाठी पाठवण्यात येतील व
त्यानुसार कार्यवाही चालू झाली आहे.संबंधित Rig व Platforms च्या
अधिकार्यांकडे OT Forms भरून जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रमुख मागणी मान्य झाल्याने कर्मचारी संघटनेने व्यवस्थापनास
Strike Notice संदर्भात दिनांक ०१ मार्च २०२१ रोजी दिलेला Action
Programme तूर्त स्थगित करत आहे.आपण आपले कार्य जोमाने पूर्ववत करावे.
प्रदीप मयेकर,
सरचिटणीस,
०९ एप्रिल २०२१
कामगार बंधू आणि भगिनींनो,
कर्मचारी संघटनेने व्यवस्थापनास Strike Notice संदर्भात दिनांक ०१
मार्च २०२१ रोजी दिलेले पत्र क्रमांक ONGC/KS/91/2021 मधील प्रमुख
मागण्यांपैकी Issue No.5 ची व्यवस्थापनाने गंभीर दखल घेत गेल्या तीन
दिवसात दोन ECC मीटिंग घेऊन Field Operator च्या पे रिविजन चा प्रलंबित
मुद्दा निकालात काढला असून येत्या एक-दोन दिवसात सदर Order
व्यवस्थापनातर्फे जारी करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी.
प्रदीप मयेकर,
सरचिटणीस,
०७ एप्रिल २०२१
कर्मचारी बंधू भगिनींनो,
आज दि. 7 एप्रिल 2021
रोजी श्रम आयुक्तांच्या कार्यालयात आपल्या स्ट्राईक नोटीस संबंधात
कन्सलिएशन मिटींग होती. सदर मिटींगला कर्मचारी संघटनेच्या वतीने
उपाध्यक्ष श्री. पराग कदम, सरचिटणीस श्री. प्रदीप मयेकर, सचिव श्री.
प्रदीप म्हाडगुत उपस्थित होते, तर व्यवस्थापनाच्या वतीने इंचार्ज आय आर
श्री. गणेशन साहेब व दक्ष साहेब उपस्थित होते. ओटी या विषयावर भाष्य
करताना युनियनने कालच झालेल्या सभेतील निर्णय सांगितला. तर
व्यवस्थापनाच्या वतीने असे सांगितले की काल जरी निर्णय झाला असला तरी
मिटिंगनंतर हेड क्वार्टर वरून आलेल्या नवीन ऑर्डरमुळे आम्ही यानंतर 14
दिवसांऐवजी 21 दिवसानंतरच ओटी देऊ. त्यामुळे कालच्या सभेतील निर्णयाची
अमलबजावणी आम्ही करू शकणार नाही. व इतर विषयांवर हेड क्वार्टर वरून
विचार सुरू आहे एवढेच कळविले आहे.
त्यावर खूप वादविवाद होऊन श्रम
आयुक्तांनी पुढील सुनावणी 4 मे रोजी निश्चित करून मिटींग संपविली.
कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यानंतर त्वरित ईडी एम एच असेट
श्री. पांडेसाहेब व इंचार्ज एचआर श्री. नावेद राव साहेब यांची भेट
घेण्याचे ठरविले. व वसुधारा भवन येथे जाऊन त्यांची भेट घेऊन घडलेल्या
घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. चर्चेदरम्यान या गोष्टी डायरेक्टर
टी अँड एफ एस श्री. ओ पी सिंग साहेब यांच्याशी सरचिटणीस श्री. प्रदीप
मयेकर यांनी दूरध्वनी द्वारे संपर्क करून मुंबईचे महत्व व येथील
परिस्थिती त्यांना सांगितली. व त्यांचेकडून मुंबईसाठी निर्देश घेतले.
या सर्व घडामोडीचे साक्षीदार उपस्थित ईडी असल्याने सर्व की
एक्झिक्युटिव्हजना योग्य ते संकेत मिळाले व उद्या इसीसी होऊन आपल्याला
पूर्वी मिळालेले निर्णय घोषित होतील असे निश्चित झाले.
यानंतर सर्व
गोष्टींची कल्पना ११ हाय येथे जाऊन ईडी एचडीएस श्री. आहुजा साहेब यांना
देऊन सर्व वृत्तांत सांगितला. त्यांनी याची खात्री करून त्वरित सर्व
रिगच्या OIM यांना योग्य ते निर्देश दिले.
उद्याच्या मिटिंगनंतर
सदर ऑर्डर आल्यानंतर चालू ड्युटीच्या 14 दिवसानंतर पुर्ण केलेल्या
दिवसांचा क्लेम करावा, तो संपुर्ण ओटी मंजूर होईल. व मार्च 2020 पासून
या निघणाऱ्या ऑर्डरच्या तारखेपर्यंत कर्मचारी 14 दिवसानंतर ओटी क्लेम
करतील, तसेच या कालावधीतील 14 दिवसानंतरच्या ओटीसोबत अनमॅन चा ओटी, 12
तासानंतरचा ओटी व नॅशनल हॉलिडेचा ओटी क्लेम करावा, परंतु 21
दिवसांनंतरचा ओटी व ड्युटी पिरियडमधील इतर ओटी व्यवस्थापन त्वरित मंजूर
करेल. उरलेल्या 7 दिवस शिल्लक ओटी संदर्भात श्रम आयुक्तांसोबतच्या
मिटींगमध्ये नंतर निर्णय होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
प्रकाश दळवी,
अध्यक्ष
०६ एप्रिल २०२१
कर्मचारी बंधू भगिनींनो,
आज
दि. 6 एप्रिल 2021 रोजी वसुधारा भवन येथे मुंबई विभागाच्या की
एक्झिक्युटिव्हज सोबत मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेची मिटींग झाली.
सदर मिटींग श्री. के. पी. पांडेसाहेब यांचे अध्यक्षतेखाली होऊन श्री.
माधवन साहेब, श्री. नमित शर्मा साहेब, श्री. ढोबल साहेब, श्री. प्रसाद
साहेब, एचआरओ श्री. सुनील सिंग साहेब, श्री. नावेद राव साहेब, आयआर
श्री. गणेशन साहेब व कर्मचारी संघटनेच्या वतीने उपाध्यक्ष श्री. पराग
कदम, सरचिटणीस श्री. प्रदीप मयेकर, सचिव श्री. प्रदीप म्हाडगुत, पंकज
कोळी, सुनील चिटणीस तसेच जयवंत रसाळ, श्रेयस जोरापूरकर आदी पदाधिकारी
उपस्थित होते. सदर सभेत खालील निर्णय घेण्यात आला.
येत्या एकदोन
दिवसात मुंबई रिजन तर्फे ड्युटी संदर्भात एक ऑर्डर काढली जाईल.
सदर
ऑर्डर आल्यानंतर चालू ड्युटीच्या 14 दिवसानंतर पुर्ण केलेल्या दिवसांचा
क्लेम करावा, तो संपुर्ण ओटी मंजूर होईल.
मार्च 2020 पासून या
निघणाऱ्या ऑर्डरच्या तारखेपर्यंत कर्मचारी 14 दिवसानंतर ओटी क्लेम
करतील, तसेच या कालावधीतील 14 दिवसानंतरच्या ओटीसोबत अनमॅन चा ओटी, 12
तासानंतरचा ओटी व नॅशनल हॉलिडेचा ओटी क्लेम करावा, परंतु 21
दिवसांनंतरचा ओटी व ड्युटी पिरियडमधील इतर ओटी व्यवस्थापन त्वरित मंजूर
करेल. उरलेल्या 7 दिवस शिल्लक ओटी संदर्भात श्रम आयुक्तांसोबतच्या
मिटींगमध्ये नंतर निर्णय होईल.
यामुळे आपला वर्क टू रुल हा घोषित
कृती कार्यक्रम सदर ऑर्डर आल्यानंतरच माघारी घेण्यात येईल व तसे आपणा
सर्वांस कळविण्यात येईल.
प्रकाश दळवी,
अध्यक्ष
०१ एप्रिल २०२१
कामगार बंधू आणि भगिनींनो,
दिनांक ३१.०३.२०२१
रोजी ओएनजीसी व्यवस्थापनाने जारी केलेली Office Order No.:- DDN/
Corp-ER/Estt-Policy/2021/Payment/768249 OFFICE ORDER (07/2021)
द्वारे देऊ करत असलेली रक्कम ही Incentive स्वरूपाची असून, आपण
केलेल्या OT (Over Time) चा याच्याशी संबंध नाही.
OT(Over Time)
संदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
कर्मचारी संघटनेने
व्यवस्थापनास Strike Notice संदर्भात दिनांक ०१ मार्च २०२१ रोजी दिलेले
पत्र क्रमांक ONGC/KS/91/2021 मधील प्रमुख मागण्या जोपर्यंत मान्य होत
नाही तोपर्यंत Action Programme स्थगित न करता तो अजून उत्स्फूर्त व
उग्र करण्यास आपण सर्वतोपरी प्रयत्नशील रहावे.याची सर्वांनी नोंद
घ्यावी.
दिनांक ०७ एप्रिल २०२१ रोजी सहाय्यक श्रम आयुक्त (ALC)
यांस कडून कर्मचारी संघटना व व्यवस्थापना सोबत नियोजित Conciliation
Proceedings नंतर आपणास योग्य ती कार्यवाही त्वरित कळविण्यात येईल.
प्रदीप मयेकर,
सरचिटणीस.
Payment to field going employees acknowlegeing their contribution
during COVID-19 pandemic.
२३ मार्च २०२१
कर्मचारी बंधू भगिनींनो,
काल दिनांक
२२.०३.२०२१ रोजी मुंबई विभागाचे जीजीएम एचआरओ - श्री.सुनील सिंग साहेब,
इंचार्ज मेडिकल - प्रणिता दास मॅडम व ओएनजीसी (WOU) कर्मचारी संघटना
यात झालेल्या चर्चेनुसार मुंबई विभागाने केलेल्या प्रयत्नांना यश आले
असून उद्या दि. २४ मार्च २०२१ पासून स. १० ते संध्या. ६ पर्यंत बीकेसी
कोवीड लस सेंटर येथील गेट क्र. ९ (9) येथे फक्त ओएनजीसी
कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सुरू करण्यात येत आहे. दररोज ५०० कर्मचाऱ्यांना
त्या ठिकाणी लस देण्याची क्षमता निर्धारीत करण्यात आली आहे. लस घेण्यास
जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे आय कार्ड व आधार कार्ड सोबत नेणे
अनिवार्य आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
आपल्या सर्वांच्या
माहितीसाठी
प्रदीप मयेकर,
सरचिटणीस
Action programme continue Circular.
२२ मार्च २०२१
कर्मचारी बंधू भगिनींनो,
आज दि. २२ मार्च रोजी
व्यवस्थापनाने कर्मचारी संघटनेला सर्व इडींच्या उपस्थितीत मिटींगसाठी
वसुधारा भवन येथे बोलावले होते. स्थितीचा आढावा घेऊन व्यवस्थापनाने
आजपासून सुरू झालेले आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. सोबत आमचे
हेड क्वार्टरशी बोलणे सुरू आहे व याबाबत मार्ग निघेल असे आश्वासनही
दिले.
मात्र कर्मचारी संघटनेने सुरू असलेल्या आंदोलनाची
अपरिहार्यता व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिली. १४ दिवसांनंतरचा OT
घोषित करा, इतर मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घ्या. त्यानंतरच आम्ही
आंदोलन मागे घेऊ, असे ठामपणे सांगितले.
आजच्या सभेत सर्व ईडीज,
जिजीएम एचआर सुनील सिंग साहेब, सीजीएम एचआर नावेद राव साहेब, सीजीएम आय
आर गणेशन साहेब, कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष पराग कदम, सरचिटणीस
प्रदीप मयेकर, सचिव प्रदीप म्हाडगुत, नवनाथ टेमकर, पंकज कोळी आदी
पदाधिकारी उपस्थित होते.
आज २२ मार्च दिनी ऑफशोर मधील सर्व
इनस्टॉलेशनवर एकजुटीने आपला अॅक्शन प्लान १००% यशस्वी केल्याबद्दल मी
सर्व कामगारांचे हार्दिक अभिनंदन करतो.
प्रकाश दळवी,
अध्यक्ष
१९ मार्च २०२१
बंधू आणि भगिनींनो,
युनियनने दिनांक ०१/०३/२०२१ रोजी दिलेल्या नोटीस नुसार ऑफशोरमध्ये
दिनांक २२/०३/२०२१ रोजी 14 दिवस वा त्यापेक्षा जास्त दिवस झालेल्या
कामगारांनी माइन्स एक्ट नुसार चौदा दिवस ऑफशोर ड्यूटी नंतर ७ दिवस
विश्रांती घ्यावी. यासाठी आपणा सर्वांना नमुना पत्र खाली दिल्याप्रमाणे
एक अर्ज OIM कड़े द्यायचा आहे.
अशा कर्मचाऱ्यांना १४ दिवसांनंतर
हेलीबेसला आणण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे अन्यथा कर्मचारी रिग व
प्लॅटफॉर्मवरच ७ दिवसांची विश्रांती घेतील. ७ दिवसांच्या विश्रांतीनंतर
कामगार ८ व्या दिवशी काम सुरू करतील.ज्या कामगारांना 14 दिवसांच्या
ड्युटी नंतर उतरवण्यात येईल त्यांनी आपल्या चौदा दिवसांचा ऑफ घेऊनच
पुढील ड्युटी जॉईन करावी.
आपल्या नोटीस मध्ये जाहीर केलेल्या
कार्यक्रमानुसार आपण माइन्स एक्ट मधील तरतुदीनुसार काम करणार आहोत याची
सर्व कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी.
प्रदीप मयेकर
सरचिटणीस
Sample Applicaton letter word format.
Sample Applicaton letter PDF format.
DY. CLC (C) letter to ONGC Chairman on 18 March 2021.
स्ट्राइक नोटिस अॅक्शन प्लॅन व माहिती.
Circular - Uran & Hazira Plant employees submit overtime forms.
Union meeting and decisions on vaccination of offshore going
employees.
Minutes of meeting Karmachari Sanghatana and ONGC Key Management
Executives held on 05 March 2021.
Strike Notice pending issues since last five years 11th March 21 to
22nd March 2021.
5 मार्च 2021
आपण दिलेल्या स्ट्राईक
नोटीस संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी आज दि. ५ मार्च २०२१ रोजी
व्यवस्थापनाने मिटींग आयोजित केली होती. सदर मिटींग मुंबई विभागाच्या
आय आर तर्फे कर्मचारी संघटना व सर्व इडींच्या उपस्थितीत घेण्यात आली.
आपल्या नोटीसमध्ये लिहिल्याप्रमाणे सर्व इश्यूवर चर्चा करण्यात आली.
युनियनतर्फे आपल्या सर्व मागण्यांचे आपण ठाम राहून समर्थन केले.
युनियनच्या १४ दिवसांच्या ड्युटीच्या आग्रही मागणीवर विचार करताना
महाराष्ट्रातील कोरोनाबतच्या सद्य परिस्थितीचा विचार करून
व्यवस्थापनाने ऑफशोर कामगारांना तात्काळ दिलासा म्हणून २१ दिवसांचा
ड्युटी पिरियड करण्याचे ठरविले. मात्र युनियनने १४ दिवसांचीच ड्युटी
पिरियड हवा असे आग्रही प्रतिपादन करून येणाऱ्या काळात यावर विचार
करण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले. सोबत क्वारेंटाईन पिरियड कमी
करण्यासाठी सोमवारी दुपारी मिटींग आयोजित करण्याचे व्यवस्थापनाने मान्य
केले.
१४ दिवसानंतर ओव्हरटाईम देण्याबाबत व सिपीपी संदर्भात मागील
केसेस पुन्हा ओपन करण्यासाठी हेड क्वार्टरशी चर्चा करण्याचे
व्यवस्थापनाने मान्य केले व त्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित
करण्यासाठी युनियनने आग्रह धरला. व २२ मार्चपूर्वी सदर मिटींग आयोजित
करण्यासाठी विनंती केली.
ऑफशोर अलाऊन्स, सेल्फ लीज, टेन्यूअर
कामगारांचे इश्यू व इतर मुद्द्यांबाबत लवकरच वरिष्ठ व्यवस्थापनाशी
चर्चा करून आपल्या युनियन सोबत मिटींग घेण्याचे व्यवस्थापनाने मान्य
केले आहे.
तसेच युनियनतर्फे आमचा ऍक्शन प्रोग्रॅम ठरविल्याप्रमाणेच
होईल याची कल्पना व्यवस्थापनाला देण्यात आली, याची सर्वांनी नोंद
घ्यावी.
धन्यवाद,
प्रदीप मयेकर
सरचिटणीस
26 FEB 2021
आज दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी कामगारांच्या Over Time
(OT) बाबत Assistant Labour Commissioner यांच्या कार्यालयात दुपारी
३:०० वा. कन्सिलेशन मिटींग झाली. या मीटिंगमध्ये व्यवस्थापनातर्फे
श्री. गणेशन साहेब,I/c - I.R. व त्यांचे सहकारी श्री. दक्ष साहेब
उपस्थित होते. कर्मचारी संघटनेतर्फे सरचिटणीस श्री. प्रदीप मयेकर
साहेब, उपाध्यक्ष श्री. पराग कदम व ऑफशोर सेक्रेटरी श्री. प्रदीप
म्हाडगुत उपस्थित होते.
या मिटिंगमध्ये कर्मचारी
संघटनेतर्फे कामगारांनी १४ दिवसांनंतर ७० ते ८० दिवसांपर्यंत सलग काम
केल्याचे नमूद केले व OT चा मोबदला मिळणे हा त्यांचा मूलभूत व कायदेशीर
अधिकार असताना व्यवस्थापन OT देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे लेबर
कमिशनर यांना सांगितले. मुंबई व्यवस्थापनाने दि. २३ जाने. २०२१ रोजी
मुंबई येथे झालेल्या तिन्ही मिटिंगचा रिपोर्ट हेड क्वार्टर ला
पाठवल्याचे नमूद गेले. तेथून आज आलेले उत्तर लेबर कमिशनर यांना सादर
केले. त्याची फोटोकॉपी यासोबत देत आहोत. या उत्तरावर कर्मचारी
संघटनेतर्फे तीव्र आक्षेप घेतला व आजही हेड क्वार्टर वरून Over Time
देण्याबाबत कोणत्याही सूचना येत नाहीत. याबाबत चर्चा होऊन पुढील
मीटिंगमध्ये हेड क्वार्टर वरून अधिकारी बोलावण्याबाबत लेबर कमिशनर
यांनी निर्णय घेतला. त्यानुसार ईडी चीफ ईआर यांना लेबर कमिशनर यांनी
नोटीस देऊन बोलविण्याचे निश्चित केले. पुढील सुनावणी दि. ७ एप्रिल २०२१
रोजी सकाळी ११:०० वाजता निश्चित करण्यात आली.
प्रदीप म्हाडगुत
ऑफशोर सेक्रेटरी,
ओएनजीसी (WOU) कर्मचारी
संघटना, मुंबई.
Letter by management in over time dispute consiliation procedings on
26th Feb 2021.

Shiv jayanti NQO
|
|